ती श्रावनातली सर पहिली,
जेव्हा नजरेला नजर भिडली,
गार वारा वाहत होता,
आणि धरणीवर वीज अवतरली,
एक क्षण तो होता सुखाचा,
एक क्षण तो अवघ्या आयुष्याचा,
एक क्षण जो क्षणभंगुर नव्हता,
एक क्षण तो तुझ्या सानिध्याचा,
आता फक्त आठवनिच उरल्या,
वेळेच्या ठापा कधीच सरल्या,
आयुष्याच्या प्रत्येक वाटा,
परत त्या क्षनाकडे फिरल्या,
अजुन त्या वाटेवर मी,
वाट तुझी पाहत आहे,
गंध तुझा प्रत्येक कळीत,
अजुन मी शोधत आहे,
येशील तू ही आस मनी,
शोधतो तुला प्रत्येक क्षणी,
येइल कधीतरी तो श्रावण परत,
हीच एक आशा घेउन लोचनी..........
- स्वप्निल
Sunday, March 15, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment